
शाळकरी मुलांचे एक टोळके बस स्टॉपवर तुफान मजा करत आहे. बस स्टॉपवर चढून ‘आनंद पोटात माझ्या…’ हे गाणं गात ही बेफिकीर मुलं मस्त नाचत आहेत. हा व्हिडीओ बघितला की कोणाचंही मन आपल्या शाळेच्या जुन्या आठवणींत रमेल. हा व्हिडीओ शाळेचे जुने दिवस, मित्र-मैत्रिणींबरोबर केलेली धमाल-मस्ती, डोळ्यांसमोरून ठरलेलं आणि एक मंद हसू नक्कीच तुमच्या ओठांवर आणेल. हा व्हिडीओ @kaunashishsingh या इन्स्टा आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर ‘शाळेच्या दिवसांची आठवण’, ‘देवाचे आभार… या पिढीला अजूनही आयुष्य कसे जगायचे हे माहीत आहे’, अशा कमेंट्स येत आहेत. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून 1 लाखांहून अधिक नेटिझन्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

























































