रत्नागिरीत बिबटय़ाचा महिलेवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिह्यात संगमेश्वर तालुक्यातील कोंडये सुवरेवाडी येथे कोंबडय़ांच्या खोलीत रात्रभर बंदिस्त राहिलेल्या बिबटय़ाने बुधवारी सकाळी दरवाजा उघडताच बाहेर झेप घेत महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात मीना सुवरे जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मीना सुवरे यांच्या घराशेजारी कोंबडय़ांसाठी चिरेबंदी खोली आहे. मंगळवारी सायंकाळी कोंबडय़ांना या खोलीत ठेवून दरवाजा बंद करण्यात आला. दरवाजा बंद करण्यापूर्वीच बिबटय़ा छुप्या मार्गाने खोलीत शिरला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्रभर खोलीतच बंदिस्त राहिलेल्या बिबटय़ाने सर्व कोंबडय़ा फस्त केल्या. मीना सुवरे या काsंबडय़ांना बाहेर सोडण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडत असताना आत दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने अचानक बाहेर झेप घेत त्यांच्यावर हल्ला केला.