75 लाख युजर्सने डीटीएच कनेक्शन सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराच्या छतावर, गॅलरीत डिश अँटेना लावून टीव्ही पाहण्याची परंपरा आता देशातून हद्दपार होताना दिसत आहे. अवघ्या एका वर्षात देशातील पेड डीटीएच ऑपरेटर्सचे 75 लाख ग्राहक घटले आहेत, अशी माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायच्या एका अहवालातून समोर आली आहे.

सध्या टाटा प्लेकडे 1.49 कोटी डीटीएच ऑपरेटर आहेत. भारती टेलिमीडिया 1.35 कोटी ग्राहकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सन डायरेक्ट 1.09 कोटी ग्राहकांसह तिसऱ्या, तर डीश टीव्ही इंडिया 2 लाख 10 हजार ग्राहकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. यूटय़ूब, नेटफ्लिक्स, जिओ सिनेमा आणि हॉटस्टार अॅप्समुळे प्रेक्षकांना त्यांच्या वेळेनुसार व आवडीनुसार हवे ते पाहण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. घराघरांमध्ये फायबर इंटरनेट, स्मार्ट टीव्ही आल्याने प्रेक्षक इंटरनेटवर किंवा स्मार्ट अॅप्सचा वापर करत आहेत.