
देशात महागाईने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. सप्टेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर 11.39 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये हा दर 9.92 टक्के होता. अन्नधान्य, इंधन, वीज आणि उत्पादित वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे ही दरवाढ झाली आहे. केंद्र सरकारने बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली आहे.
2022-23 या नव्या आधारभूत वर्षानुसार सप्टेंबरमधील महागाईचा दर आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक नोंदवला गेला आहे. सरकारने 15 जून 2026 रोजी 2022-23 हे नवीन घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष लागू केले. 11.39च्या महागाई दराचा अर्थ ज्या वस्तू गेल्या वर्षी याच वेळी घाऊक बाजारात 100 रुपयांना मिळत होत्या. त्या आता 111.39 रुपयांना विकल्या जात आहेत. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढून 5.54 टक्क्यांवर पोहोचली आहे. ऑगस्टमध्ये 4.82 टक्के होती. बटाटे, कांदे, टोमॅटो यासारख्या भाज्या तसेच खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्चे तेलही महागले आहे. या कारणांमुळे महागाई सलग 11 व्या महिन्यात वाढली आहे.
दर वाढता वाढे
जानेवारी 1.81 टक्के
फेब्रुवारी 2.13 टक्के
मार्च 3.88 टक्के
एप्रिल 8.26 टक्के
मे 9.68 टक्के
जून 9.87 टक्के
जुलै 9.78 टक्के
ऑगस्ट 9.92 टक्के
सप्टेंबर 11.39 टक्के



























































