
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मा कासवगतीने फलंदाजी करत होता. अभिषेक 24 चेंडूंमध्ये 29 धावा करून तो बाद झाला. पण या खेळीनंतरही अभिषेकच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड जमा झाला आहे.
अभिषेकने या सामन्यात मारलेला एकमेव षटकार हा या वर्षातील त्याचा 69 वा षटकार होता. यासह त्याने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडत एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनण्याचा मान मिळवला. सूर्यकुमारने 2022 मध्ये 68 षटकार मारले होते. आता अभिषेकने 69 षटकार मारले आहेत. अभिषेक हा टी–20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये पूर्ण सदस्य देशासाठी हे सर्वात जलद शतक होते.


























































