पाणी अडवा पाणी जिरवा, रत्नागिरी तालुक्यात लोकसहभागातून बंधारे बांधण्यास सुरवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पावसाने पाठ फिरवल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात युध्दपातळीवर बंधारे बांधून पाणी अडविण्याचे काम सुरू आहे.रत्नागिरी तालुक्यात आज पर्यंत विविध गावांत साडेतीनशे बंधारे बांधण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा ७७ टक्के पाऊस पडला आहे.रत्नागिरी तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे.भविष्यात निर्माण होणाऱ्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.