सुनील गावसकर यांची फलंदाजांवर जोरदार टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादमधील टी-20 सामन्यातील पराभवानंतर सुनील गावसकर यांनी हिंदुस्थानच्या फलंदाजीतील उणिवांवर भाष्य केले आहे. जर हिंदुस्थानच्या फलंदाजांनी धावांचा पाठलाग करताना जबाबदारी दाखवली नाही तर हा संघ भविष्यात यशस्वी होऊ शकत नाही, असे गावसकर यांनी सांगितले.

गावसकर सामन्यानंतर म्हणाले, ‘या हिंदुस्थानच्या संघाला सर्वप्रथम लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्या दृष्टिकोनात सुधारणा करण्याची गरज आहे. फलंदाजांनी मैदानावर जबाबदारीने खेळण्याची गरज आहे. जर फलंदाजांनी जबाबदारी घेतली नाही तर हा संघ भविष्यात यशस्वी होणार नाही.’

गावसकर यांनी दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकलेल्या संघाच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, विश्वचषक जिंकलेल्या संघाने फलंदाजीत वर्चस्व गाजवायला हवे होते, पण ती आक्रमकता फलंदाजांमध्ये दिसलेच नाही.’