देवाभाऊ, हे पाच हजार रुपये घ्या आणि तुम्हीच दिवाळी साजरी करा! संतप्त शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये देण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. धाराशीवमधील एका शेतकऱ्याने सोयाबीन विकून मिळालेल्या तुटपुंज्या रकमेत उसने पैसे घालून एपूण पाच हजारांची मनीऑर्डरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली. हे घ्या पाच हजार, तुम्हीच दिवाळी साजरी करा, असा संताप त्या शेतकऱ्याने व्यक्त केला.

दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांच्या खात्यात पाच हजार रुपये अॅडव्हान्स जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी केली. त्यावरून सरकारवर जोरदार टीका होत आहे. धाराशीवच्या सुर्डी येथील चांद पैगंबर शेख या शेतकऱ्याने सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. या शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. मशागत, पेरणी, बियाणे, खते, औषधांची फवारणी आणि काढणी अशा विविध कामांसाठी त्याला सुमारे 25 हजार रुपये खर्च झाला, मात्र प्रतिपूल परिस्थितीमुळे सोयाबीनचे अवघे 60 किलो उत्पादन मिळाले. ते विपून फक्त 3900 रुपये मिळाले. त्यामुळे तो प्रचंड निराश झाला. त्यातच सरकारने पाच हजार रुपये देण्याची घोषणा केल्याने त्याचा पारा वाढला. त्याने गावातील मित्राकडून 1100 रुपये उसने घेतले आणि सोयाबीनच्या 3900 रुपयांमध्ये टापून एपूण पाच हजार रुपयांची मनीऑर्डरच मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाने ‘वर्षा’ बंगल्यावर पाठवली.

शेतकरी दिलदार आहे, चेष्टा करू नका

इतक्या बिकट परिस्थितीत पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर समाधान मानायचे कसे, असा सवाल चांद शेख याच्याबरोबर आलेल्या शेतकऱ्यांनी केला. शासनाने शेतकऱ्यांची चेष्टा करू नये, शेतकरी इतका दिलदार आहे की, त्याने मिळालेले तुटपुंजे उत्पन्न आणि त्यात आणखी उसने पैसे टापून दिवाळीसाठी मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर केली, असे ते म्हणाले.