
मुंबई महानगरासह राज्यातील इतर शहरी भागांमध्ये रेल्वे जाळे, मेट्रो मार्ग आणि प्रादेशिक जलद परिवहन प्रणालीचा विस्तार करण्याच्या हेतूने सर्वसमावेशक योजना आखण्यासाठी सरकारने ‘टास्क पर्ह्स’ची स्थापना केली आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे अध्यक्ष विलास वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील टास्क पर्ह्समार्फत विविध क्षेत्रांसाठी योग्य परिवहन प्रणालींचा अभ्यास केला जाणार आहे.
नगरविकास विभागच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर टास्क पर्ह्सबाबत निर्णय घेण्यात आला. समितीत नगर विकास विभाग, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड , मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि एमएमआरडीएच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापक (नियोजन) संजय कुमार हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.


























































