
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 17, 18 ऑक्टोबर तसेच 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रावर ही नोंदणी केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे सांगितले. या शिबिरांमध्ये नागरिक प्रारूप मतदार यादीमध्ये त्यांचे नाव तपासू शकतात तसेच दुरुस्तीसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत अर्ज देऊ शकणार आहेत. विशेष शिबिरांच्या दिवशी मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांना मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि इतर आवश्यक प्रक्रियांबाबत मार्गदर्शन करतील.



























































