अभिनेता इम्रान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे फर्मान, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनात उतरल्याने झाली होती अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केलेल्या निदर्शनात अभिनेता इम्रान खान सहभागी झाला होता. त्यानंतर आता त्याला हिंदुस्थान सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इम्रान खान हा अमेरिकन नागरिक असून त्याला हिंदुस्थान सोडण्यासाठी 28 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या विरोधात इम्रान खानने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये इम्रान खान सहभागी झाला होता. याशिवाय 22 आणि 23 जुलै रोजी ‘नीट’ पेपरफुटीविरोधात झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या निदर्शनांमध्येही तो सहभागी झाला होता. याप्रकरणी इम्रान खान याच्यावर इमिग्रेशन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मेरी मिल्बेन भाजपला चालते, इम्रान खान नाही!

अमेरिकन गायिका मेरी मिल्बेन हिने सीजेपीला अमेरिकन फंडिग मिळत असल्याचा आरोप केला होता. त्याचा संदर्भ देत दीपके म्हणाले, ‘‘मेरी मिल्बेन अमेरिकन असूनही भाजपच्या बाजूने बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डहोल्हर असूनही भाजपविरोधात काही का बोलू शकत नाही.’’