
एसआयआर प्रक्रियेत मतदार यादीतून तब्बल 13 कोटी मतदार वगळले जाणे ही धोक्याची घंटा आहे, अशी चिंता व्यक्त करतानाच, अशा परिस्थितीत अहिंसक प्रतिकार चळवळ आवश्यक आहे, असे परखड मत हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकी खासदार प्रमिला जयपाल यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेतील डेमोव्रॅटिक पक्षाच्या खासदार असलेल्या जयपाल यांनी हिंदुस्थानातील एसआयआर प्रक्रियेची तुलना त्यांनी अमेरिकेतील ट्रम्प सरकारच्या कारभाराशी केली आहे. अमेरिकेतही ट्रम्प सरकार अशाच पद्धतीने मताधिकार हिरावून घेऊन लोकशाही पायदळी तुडवत आहेत, असे त्या म्हणाल्या. हिंदुस्थानातील लोकशाहीविरोधी कारभाराविरोधात सुरू असलेल्या अहिंसक आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.



























































