
स्पॅम कॉल रोखण्यासाठी दूरसंचार विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्स पंपन्यांना 1 नोव्हेंबर 2026 पासून मोबाईलच्या स्क्रीनवर पह्न करणाऱया व्यक्तीचे नाव आणि नंबर ठळकपणे दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता पह्नच्या स्क्रीनवर कॉलरचे नाव दिसेल.
हिंदुस्थानबाहेरील नंबर असल्यास इंटरनॅशनल कॉल असे स्पष्ट दिसणार आहे. यामुळे आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. सरकारने पंपन्यांना दिलेल्या निर्देशानुसार, 1 नोव्हेंबर 2026 पासून सर्व 4 जी आणि 5 जी मोबाईल नेटवर्कवर ‘कॉलिंग नेम प्रेझेंटेशन’ बंधनकारक करण्यात आले आहे.


























































