फुग्याला ‘पीन’ लागावी तसा लंपट पुढाऱ्याचा भांडाफोड, शहराच्या ‘प्रमुख’ नाक्यांवर चघळला जातोय विषय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुगलेल्या फुग्याला “पीन” लागावी आणि फुगा फुटावा अगदी तसचं लंपट पुढाऱ्याचे भांडाफोड झाले आहे. या पुढाऱ्याच्या ‘कामावर’ अनेकांची नजर होती. आणि हा पुढारी नेमका जाळ्यात सापडल्याने त्याची जोरदार चर्चा झाली आहे. शहराच्या “प्रमुख” नाक्यांवर हा विषय चघळला जात असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या परिसरात कामक्रीडा करण्यात व्यस्त असणाऱ्या या पुढाऱ्याला रंगेहाथ पकडून चांगलेच वठणीवर आणले आहे.हिरोगिरी करणाऱ्या या पुढाऱ्याच्या कारनाम्याची दबक्या आवाजात चर्चा पूर्वीपासूनच सुरू होती.राजकीय ताकदीवर त्या पुढाऱ्याने प्रकरणे दाबल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. लंपटगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी अनेकांची करडी नजर होतीच.शेवटी ‘कार्यक्रमस्थळी” लोकांनी धाड टाकून त्याला पकडल्यानंतर भांडाफोड झाला. सोशल मिडियावरही याप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडून पदाच्या राजीनाम्यापर्यंत गोष्टी पोहचल्या आहेत.

पिकल्या पानाचा देठ हिरवा प्रमाणे वयाच्या पन्नाशीत मौजमज्जा करणाऱ्या पुढाऱ्याच्या हे प्रकरण चांगलेच अंगलट आले आहे. नागरिकांनी धाड टाकताच त्याला दरदरून घाम फुटला. याप्रकरणातून वाचविण्यासाठी पळापळ सुरू केली असल्याची चर्चा हळू आवाजात सुरु झाली आहे. रत्नागिरी सारख्या छोट्याशा शहरात घडलेल्या या घटनेनंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीनी सूचक शब्द आणि चिन्ह सोशल मिडियावर टाकून हे प्रकरण अधिकच व्हायरल केले आहे.