देशातील 1400 नामवंत डॉक्टरांचा मुंबईत मेळा; गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनची कार्डिओकॉन परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील तब्बल 1400 डॉक्टरांनी एकत्र येत हृदयविकारासह विविध आजारांवर कोणती काळजी घ्यावी, त्यासाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत, कोणते आधुनिक तंत्रज्ञान शस्त्रक्रियांसाठी वापरले जाते यावर विचारमंथन केले. वेळीच केलेल्या चाचण्या, घेतलेले निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्याची गुरुकिल्ली 9 व्या कार्डिओकॉन -2026 परिषदेत तज्ञांनी दिली.

गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनची नववी कार्डिओकॉन परिषद 2026 पार पडली. फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि प्रख्यात हृदयविकार तज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्डिओकॉन परिषदेत देशभरातील 1400 नामवंत डॉक्टर्स सहभागी झाले होते. विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह पद्मभूषण प्रा.डॉ.ए.बी. मेहता आणि पद्मश्री डॉ. सी.व्यंकट एस.राम., ज्येष्ठ सिने अभिनेते अन्नु कपूर उपस्थित होते.

डॉ. ए.बी. मेहता, डॉ. सी.व्यंकट एस.राम., डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. दर्शन झाला, डॉ. विवेक मेहान, डॉ. गिरीष परमार, डॉ. सदानंद शेट्टी, डॉ. एस. आंबर्डेकर यांनी अत्यंत प्रभावी मागदर्शन केले. या परिषदेत हृदयरोग शास्त्रातील अद्ययावत घडामोडी आणि प्रगतीवर सखोल चर्चा झाली. या परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज डॉक्टर्स, शासकीय अधिकारी, नगरसेवक प्रकाश मुसळे, रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन  डॉ. गजानन रत्नपारखी यांच्यासह डॉ. स्मृती रत्नापारखी, डॉ राम चव्हाण, डॉ. अनिल कुमार उल्गडी, डॉ. शशांक शहा, डॉ राजेश तिवारी, डॉ. अश्विनी चव्हाण, डॉ. प्रियंवदा (अध्यक्ष, अंधेरी मेडिकल असोसिएशन), डॉ. मोना गांधी, डॉ. सीमा तिवारी, डॉ. नीता ममतौरा (अध्यक्ष, मेडिकल क्लब ऑफ विलेपार्ले), डॉ. गजानन काटे, डॉ. दिपाली काटे, सागर पांढरे, डॉ. स्मिता पाटील, डॉ. समीर पाटील, डॉ. सुहास वोरा, डॉ. प्रशांत शिंदे (अध्यक्ष, केएसडीए) आणि डॉ. येवले (अध्यक्ष, जीएमए) यांनी केले.