काळजी करू नका, सरकार तुमच्या सोबत, मुख्यमंत्र्यांची राम पूर्णेकर यांना ग्वाही 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, “काळजी करू नका, सरकार तुमच्या सोबत आहे,’’ असा विश्वास कुटुंबीयांना दिला. तसेच 2 दिवसात भेटीची वेळ देण्याचे आश्वासन दिले.

नवरात्रीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस ठाण्यात देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी त्यांची भेट घेत वडिलांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांना निवेदन दिले. या भेटीत पूर्णेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. यावेळी फडणवीस यांनी त्यांना धीर देत त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.