Jammu Kashmir – कुपवाडा येथे घुसखोरीचा डाव उधळला, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील केरन सेक्टरच्या जुमगुंड भागात नियंत्रण रेषेजवळ (LoC) शनिवारी पहाटे जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी जवानांनी आवाहन केले. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये गोळीबार सुरू झाला. यात लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांचा एक गट पहाटे 3 वाजता जुमगंड गावाजवळ खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र लष्कराने हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. लष्कराकडून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.