
कोलंबियामध्ये सोन्याची अवैध खाण कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. नारिनो प्रांतातील सांता बार्बरा दे इस्कुआंदे नगरपालिकेच्या ग्रामीण चेंबरो भागात हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्या सुरू केले.
दरम्यान, कामाची परिस्थिती आणि सुरक्षा मानके सुधारण्यासाठी अवैध आणि लहान खाणकामांना औपचारिक स्वरूप देण्याची प्रक्रिया जलद करावी, असे आवाहन गव्हर्नरने राष्ट्रीय सरकार, राष्ट्रीय खाणकाम संस्था आणि खाण व ऊर्जा मंत्रालयाला केले आहे, असे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
























































