राजेंद्र शिंदे यांची चौथ्यांदा चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची आज चौथ्यांदा एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. आरोपी टल्ली आणि पपलू यांच्यासमोर शिंदे यांना बसवून प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली. बुधवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात 29 तास त्यांची चौकशी झाली आहे.

केस डायरी न्यायाधीशांसमोर सादर

आज सुनावणी दरम्यान पोलिसांनी तपासात महत्त्वाची माहिती पुढे आल्याचे न्यायालयाला सांगितले. ही माहिती गोपनीय असल्याने ती उघड करता येणार नसल्याचे सांगत पोलिसांनी संबंधित केस डायरी न्यायमूर्ती एस.बी. साबळे यांच्या अवलोकनार्थ सादर केली.