दादर येथे कोहिनूर स्क्वेअर इमारतीत आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर पश्चिम येथील  बहुमजली कोहिनूर स्क्वेअर इमारतीमधील एका हॉटेलच्या किचनला सोमवारी आग लागली. या आगीत सुदैवाने  कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. सोमवारी सकाळी 9.18 वाजताच्या सुमारास आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने घटनास्थळी धाव घेतली. तळमजल्यासह 50 हून अधिक मजले असलेल्या या गगनचुंबी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या हॉटेलच्या कीचनपुरती आग मर्यादित होती. मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट,  महापालिकेचा आरोग्य विभाग, 108 रुग्णवाहिका सेवा  तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता वाढण्यापूर्वीच आणि ती इतरत्र पसरण्यापूर्वीच संबंधित यंत्रणांनी तातडीने नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.