रीलप्रेमींना रेल्वेचा दणका; ट्रेनमध्ये प्रवाशांना त्रास दिल्यास दंड, अन् 6 महिन्यांचा तुरुंगवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेने प्रवास करताना जर एखाद्या व्यक्तीने मोबाईलवर मोठय़ा आवाजात रील बनवल्यास किंवा गाणे वाजवल्यास त्या व्यक्तीविरोधात एक हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असा नियम दक्षिण रेल्वेने जारी केला आहे.

रील बनवायची असल्यास किंवा गाणे ऐकायचे असल्यास प्रवाशाने ईयरफोनचा वापर करावा, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वेशिवाय जर प्रवाशाने रेल्वे स्टेशनवर रील किंवा गाणे मोठय़ाने वाजवल्यास त्या प्रवाशाला या दोन्ही गुह्यांसाठी जबाबदार धरले जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार, जर कोणत्याही प्रवाशाने रेल्वे स्टेशन परिसरात किंवा धावत्या रेल्वेत मोबाईलच्या स्पीकरवर गाणे वाजवल्यास, ऑडिओ ऐकत असल्यास दुसऱ्या प्रवाशाला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.