US Plane Incident – लास वेगास विमानतळावर मोठी दुर्घटना, विमान धावपट्टीवरून घसरले अन् कुंपणाला धडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील लास वेगास विमानतळावर मोठी दुर्घटान घडली. उड्डाण घेत असताना एक खासगी जेट विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाहेरील कुंपणाला धडकले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने विमानतळावरील नियोजित उड्डाणे तात्पुरती स्थगित केली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळावर डसॉल्ट फाल्कन 50 हे विमान रविवारी सकाळी 11 वाजता उड्डाण घेत असताना घसरले. विमानतळाच्या प्रवक्त्या मोनिका बर्टाकी यांनी या घटनेला दुजोरा दिली आहे. या घटनेनंतर, तपासणीसाठी दोन धावपट्ट्या बंद करण्यात आल्या आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने विमानतळावरील नियोजित उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली.