
येमेनच्या शबवा प्रांतातील येमेनी सरकारच्या लष्करी प्रशिक्षण शिबिरावर सोमवारी इराण-समर्थक हुथी बंडखोरांनी हल्ला केला. यात किमान 18 जण ठार झाले आहेत. हा हल्ला सकाळी करण्यात आला. यात सैनिकांना लक्ष्य करण्यात आलं होतं. हुथी बंडखोरांनी तीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली.
येमेनमधील सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि हुथी बंडखोर यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून संघर्ष तीव्र झाला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर सुरू झालेल्या व्यापक प्रादेशिक संघर्षात ही एक नवीन आघाडी बनली आहे. दरम्यान, रियाधमध्येही हुथींनी हल्ला केला.
रविवारी, नजरानच्या निवासी भागात हुथींचा एक क्षेपणास्त्र डागला. यात सहा नागरिक जखमी झाले असून, तीन घरे व तीन वाहनांचे नुकसान झाले.

























































