
शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र आंदोलनात सहभागी होणाऱया व्यक्तींची पार्श्वभूमी आणि आंदोलनामुळे सर्वसामान्यांना होणारी गैरसोय या बाबींचा विचार करणेही आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी आंदोलनात सहभागी होऊ नये असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आज नोंदवले. या याचिकेप्रकरणी हायकोर्टाने सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश पुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुंबईत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनावेळी पोलिसांनी काही व्यक्तींना बेकायदा ताब्यात घेतल्याचा आरोप करत अॅड. सागर देवरे यांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आज सोमवारी मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.
इम्रान खानच्या याचिकेवर 26 ऑक्टोबरला सुनावणी
अभिनेता इम्रान खान याला 28 ऑक्टोबरपूर्वी देश सोडण्याच्या नोटिसीला इम्रान खान याने हायकोर्टात आव्हान दिले असून या याचिकेवर 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
सौरभ दास, आशुतोष रांका यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची न्यायालयीन कोठडी दोन दिवस वाढवण्यात आली आहे. जंतरमंतरवर तिरंगा फडकावत निदर्शने केल्याच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यात आली आहे.





























































