कौटुंबिक वादातून हेड कॉन्स्टेबलने उचलले टोकाचे पाऊल, आधी पत्नी व मुलांना गोळ्या घातल्या मग स्वतः संपवले जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबच्या मानसा जिल्ह्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. मानसा कोर्टाजवळ पंजाब पोलिसातील हेड कॉन्स्टेबल गुरविंदर सिंह याने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीला आणि दोन मुलांना गोळ्या घातल्या आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून जीवन संपले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भयानक घटनेत हेड कॉन्स्टेबल गुरविंदर सिंग आणि त्याच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याची पत्नी आणि दुसरा मुलगा गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरविंदर सिंह यांवी कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मानसाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव चौधरी यांनी सांगितले की, सिंग यांच्या कुटुंबात वाद होता. गुरविंदर सिंग यांच्या एका मुलाला मानसा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पत्नीला आणि दुसऱ्या मुलाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून कौटुंबिक वादाचे मूळ कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती समजून घेण्यासाठी गुरविंदरच्या नातेवाईकांची चौकशी केली जाईल. तसेच त्याच्या पत्नीची प्रकृती सुधारल्यावर तिचीही चौकशी केली जाऊ शकते.