
संगमेश्वर-देवरुख मार्गावरील करंबेळे घाटात बुधवारी सकाळी स्विफ्ट डिझायर आणि एर्टिगा या दोन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघाताची अधिक माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

























































