
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रानडुकराची शिकार करण्यासाठी गेलेल्या शिकाऱयाचाच गोळी लागून मृत्यू झाला. विजय सपाटे असे त्याचे नाव असून या घटनेत अन्य दोघे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
संजय गांधी उद्यानात शिकार करण्यासाठी बंदी आहे. तरीदेखील चेना गाव व परिसरातील पाच जण रात्रीच्या अंधारात रानडुकराची शिकार करण्यासाठी गेले. त्यातील एकाने बंदुकीतून गोळ्या झाडल्या. पण गोळी थेट विजय सापटे (60) यांच्या छातीत घुसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या शिकार प्रकरणी जखमी कुणाल शेलार, कल्पेश ढगळा यांच्यासह महेश गायकर, कातोड लाभड, डॉ. राजेश पालांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे गोळीबारात मृत्यू झालेले विजय सापटे यांच्यावर मध्यरात्रीच परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले.
खोटे प्रमाणपत्र देणारा डॉक्टर शिंदे गटाचा पदाधिकारी
विजय सापटे यांचा शिकार करताना गोळी स्वतŠलाच लागून मृत्यू झाला. पण डॉक्टर राजेश पालांडे यांनी त्यांचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झाल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होत आहे. पालांडे हे शिंदे गटाच्या वैद्यकीय विभागाचे पदाधिकारी असल्याने या प्रकरणाचा संशय वाढला आहे.


























































