असं झालं तर… क्रेडिट कार्ड ऑक्टिव्हच केले नाही?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर कोणताही क्रेडिट कार्डधारक कार्ड ऑक्टिव्ह करण्यासाठी कोणतीही विनंती 12 महिन्यांपर्यंत करत नसेल, तर बँक/कार्ड देणारी पंपनी त्या कार्डला बंद करण्यास पात्र असेल.

नवीन क्रेडिट कार्ड ऑक्टिव्ह करणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमच्या बँक किंवा क्रेडिट कार्ड पंपनीच्या सुरक्षित माध्यमांचा वापर करून ते लगेच करू शकता.

तुमच्या बँकेच्या अॅपमध्ये जा आणि लॉगिन करा. ‘Cards’ किंवा ‘Credit Card’ सेक्शनमध्ये जा. तिथे तुम्हाला ‘Activate’ किंवा ‘Set PIN’ चा पर्याय मिळेल.

बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर नेट बँकिंग लॉगिन करा. ‘Credit Card’ विभागात जाऊन तुमचे कार्ड निवडा आणि नवीन पिन (PIN) जनरेट करून कार्ड ऑक्टिव्ह करा.

जवळच्या संबंधित बँकेच्या ATM मध्ये जा. कार्ड स्वाईप करा, ‘Generation of PIN’/’Green PIN’ चा पर्याय निवडा. रजिस्टर मोबाईलवर आलेला OTP टाकून नवीन पिन तयार करा.