
कैलास मानसरोवर यात्रेत माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी घोडय़ावरून पडून जखमी झाल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना यात्रा सोडून परतावे लागले आहे. मीनाक्षी लेखी यांना धारचुला येथील नाभिढांग येथून हेलिकॉप्टरने देहरादून येथे पोहोचवले जाणार आहे. यंदा 750 यात्रेकरूंची निवड कैलास मानसरोवर यात्रेसाठी झालेली आहे. त्यापैकी 500 यात्रेकरू (10 गट ) नाथुला दर्रे येथून, तर उर्वरित 250 यात्रेकरू लिपुलेख दर्रे, उत्तराखंड येथून प्रवास करतील. एक गट परतल्यानंतर दुसरा गट रवाना होणार आहे.