
दरवर्षी लाखो लोक हिंदुस्थान सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारत आहेत. 2024 या वर्षात दोन लाख लोकांनी हिंदुस्थान कायमचे सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्याची कबुली केंद्र सरकारने संसद सभागृहात दिली. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री कीर्तिवर्धन यांनी सांगितले की, 2024 मध्ये 2 लाख 6 हजार, 2023 मध्ये 2 लाख 16 हजार 219, 2022 मध्ये 2 लाख 25 हजार, 2021 मध्ये 1 लाख 63 हजार लोकांनी हिंदुस्थानचे नागरिकत्व सोडले. आकडेवारीनुसार, 2020 नंतर हिंदुस्थान सोडणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.