आता व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी इन्स्टा, फेसबुकवरून बदलता येणार

व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’ आपल्या युजर्ससाठी एक नवीन आणि उपयुक्त फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे आता तुम्हाला तुमचा इन्स्टाग्राम किंवा फेसबुक प्रोफाईल फोटो थेट व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी म्हणून लावता येणार आहे. हे फिचर सध्या पहिल्या टप्प्यात असून, लवकरच ते सर्व युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या ‘डब्ल्यूएबीटाइन्फो’च्या अहवालानुसार, मेटा एक नवीन ‘प्रोफाईल फोटो सिंक’ फिचरवर काम करत आहे. हे फिचर मेटाच्या ‘अकाऊंट सेंटर’मध्ये दिले जाईल. तिथून युजर्स आपले फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट्स एकत्र जोडू शकतात. एकदा अकाऊंट्स लिंक झाल्यावर, एकाच ठिकाणाहून प्रोफाईल पह्टो बदलण्याचा पर्याय मिळेल.