संघाचा संबंध नाही; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावर सरसंघचालकांची प्रतिक्रिया

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा 17 वर्षांनी निकाल लागला. मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात 6 जणांचा मृत्यू झाला. 100 नागरिक जखमी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांनी मोहन भागवत यांना या खटल्याच्या निकालाबाबत प्रतिक्रिया विचारली. त्यावर सरसंघचालक भागवत यांनी याच्याशी संघाचा सबंध नाही असे उत्तर दिले. संपूर्ण देशाच लक्ष या निकालाकडे लागले होते. या प्रकरणात सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयए कोर्टाने हा निकाल दिला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. मात्र, विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

प्रश्न पैशांचा नाही, पण मला माझे 900 रुपये परत हवेत! मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर समीर कुलकर्णींची मागणी

साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट नव्हता. नंबरप्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या दोन वर्ष आधी साध्वी प्रज्ञा संन्यासी बनल्या. भौतिक संपत्तीपासून त्या लांब होत्या असे न्यायालयाने म्हटले आहे. मालेगावमध्ये स्फोट झाला हे फिर्यादी पक्षाने सिद्ध केलो. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या मोटरसायकलवरच तो बॉम्ब ठेवलेला होता हे सिद्ध करता आले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.