फिलिपिन्सचे राष्ट्रपती हिंदुस्थान दौऱ्यावर येणार

फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनेंड आर मार्कोस ज्युनिअर हे पुढील महिन्यात हिंदुस्थान दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट असा पाच दिवसांचा असणार आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी लुईस अरनेटा मार्कोस, कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी यांचे एक शिष्टमंडळ येणार आहे. राष्ट्रपती मार्कोस हे 8 ऑगस्ट 2025 ला फिलिपिन्सला परतण्याआधी बंगळुरूचा दौरा करणार आहेत.