
दोन हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या यूपीआय ट्रान्झॅक्शनवर जीएसटी लावण्याची कोणतीही योजना नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. जीएसटी काऊन्सिलकडून दोन हजारांच्या वरच्या यूपीआय ट्रान्झॅक्शवर जीएसटी लावण्याचा कोणताही प्रस्ताव आला नाही, असे ते म्हणाले. जीएसटी दर आणि सूट पूर्णपणे जीएसटी काऊन्सिलच्या शिफारशींवर आधारित असतात. त्यामुळे सरकार काऊन्सिलच्या मंजुरीविना कोणताही निर्णय घेत नाही, अशी स्पष्टोक्तीही पंकज चौधरी यांनी दिली.