15 हजार पगाराच्या लिपिकाकडे 30 कोटी; 24 घरे, दीड किलो चांदी जप्त

कर्नाटकातील कोप्पल येथे राहणाऱ्या एका माजी लिपिकाच्या घरात पैशांसोबत सोने आणि चांदीचे घबाड सापडले आहे. लोकायुक्त यांनी टाकलेल्या छाप्यात या लिपिकाकडे 30 कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. कलाकप्पा निदागुंडी असे या माजी लिपिकाचे नाव आहे. या लिपिकाला केवळ 15 हजार रुपये पगार होता. तरीही त्याच्याकडे तब्बल 30 कोटी रुपयांची संपत्ती आढळल्याने सर्व जण अवाक झाले आहेत.

जी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये वेगवेगळे 24 घरे, 4 फ्लॅट, 40 एकर जमीन, 350 ग्रॅम सोने, दीड किलो चांदी आणि चार गाड्यांचा समावेश आहे. ही सर्व संपत्ती आरोपीची पत्नी आणि मेव्हण्याच्या नावावर होती. हा लिपिक कर्नाटक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड अर्थात केआरआयडीएलमध्ये काही वर्षापासून कामाला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता लोकायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली. कलाकाप्पा निदागुंडी आणि केआरआयडीएलमधील एक माजी अभियंता 72 कोटीच्या घोटाळ्यात अडकले आहेत.