
केसतोड (फोड) झाला असेल तर यावर काही घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी गरम पाण्यामध्ये कापड भिजवून फोडावर शेकल्याने वेदना कमी होतात. चहाच्या झाडाचे तेल बोळ्याने फोडावर लावल्यास फरक पडतो. हळद अँटिइंफ्लेमेटरी आणि अँटिसेप्टिक असते. हळद आणि मध एकत्र करून पेस्ट तयार करून फोडावर लावा.
फोडावर नारळ तेल लावल्यानेही आराम मिळू शकतो. कांद्याचा रस व लसणाची पेस्टसुद्धा फोडावर लावता येऊ शकते. फोडाला पिळू नका. यामुळे संसर्ग वाढण्याची भीती असते. जर जास्त वेदना होत असतील, तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.