
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टचा अपघात झाल आहे. पहिल्या मजल्यावरून लिफ्ट आदळून थेट जमिनीवर कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात जरांगे पाटील थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेले होते. याच वेळी दुपारी अडीचच्या दरम्यान लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. यावेळी जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे काही सहकारी लिफ्टमध्ये होते. लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेले होते. याच वेळी दुपारी अडीचच्या दरम्यान लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. pic.twitter.com/qp5KNHslz2
— Saamana Online (@SaamanaOnline) August 3, 2025