
हवाई दलात अग्निवीर वायुदल भरतीसाठी अर्ज 11 जुलै 2025 पासून सुरू झाले. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 होती, जी 4 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटवरून उमेदवार अर्ज करू शकतात. गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये किमान 50 टक्के गुणांसह इंटरमिजिएट (12 वी) किंवा किमान 50 टक्के गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल / संगणक विज्ञान / इन्स्टमेंटेशन टेक्नॉलॉजी / आयटी मध्ये 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा अशी पात्रता आहे. वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षे अशी आहे. वय 1 जानेवारी 2005 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान असावे.