रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीला गेलाय… चिंता नको! नवीन सिमकार्ड टाकल्यास आरपीएफची रिंग वाजणार

लोकल ट्रेन किंवा मेल-एक्स्प्रेसच्या प्रवासात मोबाईल फोन चोरीला गेला वा हरवला असेल तर आता चिंता करायला नको. अशा मोबाईल चोरीचा छडा लावण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाच्या धोरणाला अनुसरून रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) विशेष मोहीम हाती घेतली आहे. गहाळ वा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक आणि ट्रक करण्यासाठी आरपीएफ ‘सीईआयआर’ पोर्टलचा वापर करणार आहे.

प्रवासी त्यांच्या हरवलेल्या मोबाईल पह्नबाबत ‘रेल मदत’ अॅपद्वारे किंवा हेल्पलाईन क्रमांक 139 वर कॉल करून किंवा ‘सीईआयआर’चा फॉर्म भरू शकतात. त्याआधारे आरपीएफ प्रवाशाचा मोबाईल फोन ट्रॅक करू शकणार आहे. तो मोबाईल कधीही नवीन सिमकार्ड टाकून ऑक्टिव्ह केला तरी त्याचा अलर्ट आरपीएफला मिळणार आहे. त्यानंतर आरपीएफ संबंधित व्यक्तीला जवळच्या पोलीस ठाण्यात मोबाईल फोन जमा करण्यास सांगू शकतात. त्या व्यक्तीने मोबाईल वेळीच जमा न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते