तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना नोटीस बजावली आहे. तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन मतदार ओळपत्र जारी करण्यात आल्याचा आरोप केला होता. हे मतदार ओळखपत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यास आणि निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. जो एपिक क्रमांक तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत दाखवला तो वैध नाही, असा दावाही निवडणूक आयोगाने केला आहे. निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राच्या ओरिजिनल कॉपीची मागणी केली आहे. दोन एपिक क्रमांक कसे जारी झाले, याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.