टीसी कार्यालयात तोडफोड, बोरिवलीत एकाला अटक

दंडाच्या रक्कमेच्या वादातून टीसी कार्यालयात तोडपह्ड प्रकरणी एका प्रवाशाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. राहुल रसाळ असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

समशेर इब्राहिम हे पश्चिम रेल्वेत उपसीटीआय म्हणून काम करतात. शनिवारी दुपारी ते अंधेरी रेल्वे स्थानकातून निघालेल्या लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासात होते. तेव्हा राहुल हा प्रथम वर्गाच्या डब्यात प्रवास करत होता. त्याच्याकडे दुसऱ्या वर्गाचे तिकीट होते. त्यामुळे समशेर याने त्याला दंडाची रक्कम भरण्यास सांगितली. दंडाच्या रक्कमेवरुन वाद झाला. तिघांना समशेर हे फलाट क्रमांक 10 येथील टीसी कार्यालयात घेऊन आले. तेव्हा राहुलने त्याच्याशी हुज्जत घातली. सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

कार्यालयातील साहित्याची तोडपह्ड केली. हा प्रकार समजताच बोरिवली रेल्वे पोलीसचे वरिष्ठ निरीक्षक दत्ताजी खुपेरकर आदींचे पथक घटनास्थळी आले. सरकारी कामात अडथळा आणि कार्यालयात तोडपह्ड केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी राहुलला अटक केली. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.