दुबे म्हणजे उद्योगपतींचा दलाल, त्याला महत्त्व देण्याची गरज नाही- संजय राऊत

महाराष्ट्रद्रोह्यांना पायघड्या घालण्याचे काम भाजप करत आहे. दुबेसारख्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थन करत आहेत. दुबे, चौबे, मिश्रा यांचे महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे, त्यांच्या राज्यात नोकऱ्या, उद्योगधंदे नसल्याने ते महाराष्ट्रात आले, मुंबईने त्यांना आपलेसे केले. मात्र, आता तेच मुंबई लुटत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच दुबेसारखे लोकं ही उद्योगपती आणि भाजपचे दलाल आहेत, त्यांना जास्त महत्तव देण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

जो महाराष्ट्राविरोधात, मराठी माणसाच्या विरोधात बोलत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकप्रकारे त्याचे समर्थन करत आहेत. त्यामुळे आपण अशा व्यक्तींना फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे त्यांनी निशिकांत दुबेबाबात सांगितले. हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. असे अनेक दुबे आले आणि गेले. मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे आणि तो कायम राहील.106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळाला आहे. त्या हुतात्म्यांमध्ये दुबे, चौबे, मिश्रा नाहीत, हे दुबे यांनी समजून घेण्याची गरज आहे. छातीचा कोट करून महाराष्ट्र लढला, मराठी माणूस, गिरणी कामकार, सर्वसामान्य जनता लढली आणि ही मुंबई आपल्याला मिळाली.

ते इथे पैसे कमवायला आलेत, म्हणजे मुंबई ओरबाडायला आले आहेत.त्यांच्या राज्यात नोकऱ्या, उद्योगधंदे नसल्याने ते मुंबईत आलेत. मुंबईचा पैसा ते त्यांच्या राज्यात नेत आहेत. मराठी माणसाची गळचेपी करत ते मुंबई लुटत आहेत. मुंबईचं भलं करण्यासाठी किंवा मुंबईचा विकास करण्यासाठी ते इथे आलेले नाहीत. शिवसेना आणि मनसे संपण्याची भाषा करणाऱ्या निशिकांत दुबेला निवडणुका झाल्यावर मुंबईत बोलावू आणि कोण संपले आहे, ते त्याला दाखवू. त्याला एवढे महत्त्व देण्याची गरज नाही. तोफक्त उद्योगपतींचा दलाल आहे.अशा दलालांना भाजपने आणले आहेत. असेच दलाल भाजपने मुंबईतही पाठवले आहेत, त्या दलालांना आमचा विरोध आहे. असे दलाला समाजात तेढ निर्माण करत आहेत.