
उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनामुळे चिखल, दगड मातीच्या लोंढय़ाखाली अख्खे गाव गडप झाले. त्यात तब्बल 150 जण गाडले गेल्याची भीती बचाव पथकांनी व्यक्त केली आहे. कुठलाही रस्ता आणि बाजारपेठ शिल्लक नाही. जिकडेतिकडे 20 फूट ढिगाऱ्याचा थर दिसत असून स्मशानशांतता आहे. या ढिगाऱ्याखाली गावातील तरुण, उद्योजक आणि पर्यटकही सापडले असून लष्कराचे जवान, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ बचावकार्य करत आहेत.
पूर आला तेव्हा गावात वडिलोपार्जित मंदिरात अनेक जण सामूहिक प्रार्थना करत होत. ते वाचले, परंतु गावातील तरुण, व्यापारी आणि पर्यटक पुरात अडकले. आजपासून हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
n शिमल्यात बुधवारी ढगफुटी झाल्यामुळे अक्षरशः महापूर आला. यात 360 घरे कोसळली. तसेच दोन दिवसांत तब्बल 16 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. चंदीगड-मनाली चौपदी उड्डाणपुलावर भेगा पडल्या.