
तुम्ही आजवर अनेक गाडय़ांवर, दुकानांवर लिहिलेल्या वेगवेगळ्या पाटय़ा वाचल्या असतील. अनेकदा या पाटय़ांमधून भन्नाट सूचना दिल्या जातात. एका चहावाल्याने लिहिलेली अशीच एक पाटी चांगलीच व्हायरल होतेय. ही पाटी खासकरून चोरांसाठी लिहिण्यात आली आहे, जी वाचून तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही. ‘या टपरीवरील सर्व सामान घरी नेले आहे. त्यामुळे आपला रात्रीचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नये. आपण लॉक तोडल्यावर वेल्डिंगला 500 रुपये खर्च येतो’ असे या पाटीवर लिहिले आहे. रात्रीच्या वेळी बंद दुकानांत चोरीच्या घटना घडताना दिसतात. अनेकदा दुकानपह्डी करून चोर असल्या नसलेल्या सर्व गोष्टी चोरून पसार होतात. अशाने विव्रेत्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. अशाच प्रकारे रस्त्यावर चहा विकणाऱ्या चहावाल्याने टपरीवर चोरीची घटना घडू नये म्हणून ही क्लृप्ती लढवली आहे.