
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) व सर्वसाधारण विमा महामंडळ (जीआयसी) या कंपन्यांच्या कर्मचाऱयांची पगारदार वर्गातील अग्रगण्य असलेली विमा कामगार को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भारतीय विमा कर्मचारी सेना व ऑल इंडिया फेडरेशन पुरस्पृत ‘शिवसहकार पॅनल’ने 21 पैकी 21 जागा जिंकल्या. 40 वर्षे एकाच संघटनेची असलेली मत्तेदारी मोडून शिवसहकार
पॅनलने इतिहास घडवला.
शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविण्यात आली. सदर ऐतिहासिक विजयात आमदार सुनील शिंदे, प्रमुख पदाधिकारी गोपाळ शेलार, रमेश भट, महेश लाड, अजय गोयजी, सुरेश नार्वेकर, संजय शिर्पे, संजय डफळ, अजय दळवी, हेमंत सावंत, अनंत वाळके, शरद एक्के, दीपक मोरे, किरण चोरगे यांचा मोलाचा वाटा होता.
विजयी उमेदवार
प्रशांत सावंत, दिनेश बोभाटे, सचिन खानविलकर, अंकूश कदम, जगदीश वेताळ, मनोहर लाड, निलेश जुवेकर, मिलिंद सारंग, केदार बोरवणकर, विजय बिरमोळे, शैलेश दाभोळकर, सुभाष शेलार, संतोष ठापूर, अल्हाद नाईक, स्वप्नील धेंडे, प्रकाश आग्रे, संजय चेवले, सागर खानविलकर, संतोष काकड, क्षितिजा मेश्राम, समृद्धी जाधव.