पिक्चर अभी बाकी है! राहुल गांधी यांचा आयोगाला इशारा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा हल्ला चढवला. ‘एक व्यक्ती एक मत’ हा संविधानाचा पाया आहे. त्याचे संरक्षण करणे आयोगाचे कर्तव्य आहे, पण पार पाडले जात नाही. त्यामुळे आम्ही ते करत आहोत आणि ते थांबणार नाही. ‘पिक्चर अभी बाकी है,’ असा सूचक इशारा राहुल गांधी यांनी दिला. बिहारच्या मतदार यादीत 124 वर्षांची मिंता देवी आहे. हे फक्त एक उदाहरण नाही. अशी असंख्य उदाहरणे आहेत, असे ते म्हणाले.