
‘शक्तिपीठ नको… शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे!’ असे साकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचरणी घालण्यात आले.
शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या पार्श्वभूमीवर आज श्री अंबाबाई मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी शेतकरी कर्जमुक्ती दिंडी घेऊन जाणारे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी, ‘महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी वचनानाम्यात ‘शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार’ असे अभिवचन दिले; पण सरकारला त्याची आठवण नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही, तर अंबानी, अदानींचे आहे,’ अशी टीका देवणे यांनी केली.