
उत्तराखंडच्या धरालीनंतर आता जम्मू-कश्मीरच्या किश्तवाडमधील चशोटी गावात ढगफुटीसारखा पाऊस आणि भूस्खलन झाल्याने डोंगरउतारावरून दगड, माती आणि चिखलाचा लोंढा वाहून आल्याने हाहाकार उडाला. ढिगाऱ्याखाली सापडून 46 जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 167 जणांना वाचवण्यात आले असून 38 जण गंभीर जखमी झाले, तर अनेक जण वाहून गेल्याची भीती आहे.
चशोटी गावात हजारो भाविक मचैल मातेच्या यात्रेसाठी जमले होते. त्या वेळी भीषण नैसर्गिक आपत्ती ओढवली. अनेक घरे, वाहने, हॉटेल्स वाहून गेल्याचे वृत्त आहे.