प्रसाद निवडणूक लढणार

हिंदुस्थानचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेची (केएससीए) निवडणूक लढणार आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 दरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अनिल पुंबळे अध्यक्ष असताना प्रसादने 2013 ते 2016 या कालावधीत केएससीएचे उपाध्यक्षपद सांभाळले होते; परंतु तेव्हापासून त्याने संघटनेपासून स्वतःला दूर ठेवले आणि प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. व्यंकटेश प्रसादच्या पॅनेलमध्ये अनुभवी सदस्य विनय मृत्युंजय यांचाही समावेश असेल. मृत्युंजय हे केएससीएचे माजी कोषाध्यक्ष आणि बीसीसीआयच्या वित्त समितीचे सदस्य आहेत. विद्यमान रघुराम भट्ट यांच्या नेतृत्वाखालील केएससीए कार्यकारिणीचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.