
जगात सर्वाधिक विषारी साप म्हणजे किंग कोब्रा. हा सापला चावला तर ती व्यक्ती मेलीच म्हणून समजा. पण 15 वर्षाच्या मुलगा कोब्रा चावल्यानंतरही वाचला आहे.
उत्तर प्रदेशच्या कानपूर भागात 15 वर्षाचा करण हा सरपण गोळा करायला गेला होता. तेव्हा त्याला कोब्रा चावला. गावकऱ्यांनी तातडीने त्या कोब्राला मारून टाकलं. आणि त्याच सापाला आणि करणला घेऊन हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी करणला तपासून त्याला दोन तासांत अँटी वेनमची 76 इंजेक्शन दिले. करण आधी बेशुद्ध होता पण उपचारानंतर त्याला शुद्ध आली. आता त्याची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.